वरोर, चिंचणीसाठी नवीन वीज वाहिनी देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरोर, चिंचणीसाठी नवीन वीज वाहिनी देणार
वरोर, चिंचणीसाठी नवीन वीज वाहिनी देणार

वरोर, चिंचणीसाठी नवीन वीज वाहिनी देणार

sakal_logo
By

डहाणू, ता. २८ (बातमीदार) : वरोर, चिंचणी फिडरवर नेहमीच वीजपुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील डायमेकिंग व्यवसाय सतत बंद ठेवावा लागत आहे. कामगारांना वीज पुरवठ्याअभावी बसून राहावे लागते. तसेच डायमेकिंग व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सीएनसी मशीन विजेच्या लोड कंजक्शनमुळे नेहमी खराब होऊन हजारोंचा भुर्दंड सोसावा लागतो. डायमेकर उत्कर्ष सेवा संघ चिंचणीतर्फे महावितरणच्या अधीक्षक अभियंता नागावकर, कार्यकारी अभियंता प्रताप मचीये यांची पालघर येथे डायमेकर शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळातर्फे नागावकर यांना एक निवेदन देण्यात आले.

वरोरा आणि चिंचणी फिडरवर सतत खंडित होणारा वीज पुरवठा आणि लोड कंजक्शन याबद्दलच्या अडचणी मांडण्यासाठी डायमेकर उत्कर्ष सेवा संघ चिंचणीतर्फे महावितरणच्या अधीक्षक अभियंता नागावकर, कार्यकारी अभियंता प्रताप मचीये यांची पालघर येथे डायमेकर शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात डायमेकर उत्कर्ष सेवा संघाचे अध्यक्ष रमेश वझे, विकास मडवे, भरत बाणे, जिल्हा परिषद सदस्य देवानंद शिंगडा, जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, संजय यादव, नीलेश धानमेहेर, केसरी पाटील, शशिकांत तामोरे, बाळकृष्ण पाटील होते. चिंचणी, वाढवण भागातील डायमेकिंग व्यवसायासाठी सुरळीत वीजपुरवठा राहण्यासाठी देदाळे येथे असणाऱ्या वरोर फिडर अंतर्गत असणारी तीन किलोमीटर लांबीच्या तारांची लाईन बदलून नवीन टाकण्यात येईल. डायमेकिंग भागासाठी चिंचणी आणि वरोर फीडरचा वेगळा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता नागावकर यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94485 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..