९४ मंडळांनाच बाप्‍पाचा प्रसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९४ मंडळांनाच बाप्‍पाचा प्रसाद
९४ मंडळांनाच बाप्‍पाचा प्रसाद

९४ मंडळांनाच बाप्‍पाचा प्रसाद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : गणेशोत्सवाच्या काळात उभारण्यात येणाऱ्या मंडप, ध्‍वनिक्षेपक यांच्यासह विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने १९२ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी केवळ १९ मंडळांनाच परवानगी मिळाल्याची बाब समोर आली होती. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी परवानगी दिलेल्या मंडळांच्या संख्येत ७५ ने वाढ झाली असून परवानगी मिळालेल्या मंडळांची संख्या ९४ इतकी झाली आहे; तर आतापर्यंत महापालिकेकडे २४७ गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी केली असून शिल्लक मंडळांनादेखील वेळेत परवानगी देण्यात येणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
गणेशोत्सव या सणाच्या काळात उभारण्यात येणारे मंडप, ध्‍वनिक्षेपक यांच्यासह विविध परवानग्या घेणे बंधनकारक आहे. या परवानग्या घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची फरपट होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. महापालिकेने ऑनलाईन पद्धतीबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेदेखील अर्ज स्‍वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत महापालिकेकडे दोन्ही पद्धतींनी १९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. मंडपासाठी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभाग समितीमधील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून घटनास्‍थळी जाऊन मंडपाच्या आकाराची पाहणी करण्‍यात येते. त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी जात आहेत. त्यात स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन विभाग या विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर १९२ पैकी १९ मंडळांना मंडपउभारणीची परवानगी दिली होती. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने वाहतूक व इतर दोन विभागांचा पाठपुरावा करून त्यांच्याकडे आलेले अर्ज निकाली काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आतापर्यंत ९४ मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली. त्यातही नऊ मंडळांनी ऑफलाईन आणि ऑनलाईनलाही अर्ज केल्याने त्यांची परवानगी रखडल्याची माहिती समोर आली आहे.
....
ऑफलाईन पद्धतीलाच अधिक पसंती
ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनची पद्धत सुलभ असतानाही शहरातील अनेक मंडळांनी ऑफलाईन पद्धतीलाच अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. ऑफलाईन १५१ अर्ज प्राप्त झाले असून ९६ मंडळांनी ऑनलाईन पद्धतीला पसंती दिली.
...
प्रभाग समितीनिहाय प्राप्त अर्ज
समिती अर्ज
कोपरी ०१
नौपाडा ०६
वागळे २४
लोकमान्य १४
वर्तकनगर ०७
माजिवडा मानपाडा १०
उथळसर १०
कळवा १८
मुंब्रा ०२
दिवा ०२

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94492 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..