Mumbai Crime News : मुस्लिम व्यक्तीला हिंदू नावाने आधारकार्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adhar Card
मुस्लिम व्यक्तीला हिंदू नावाने आधारकार्ड

मुस्लिम व्यक्तीला हिंदू नावाने आधारकार्ड

मुंबई : कोणत्याही शासकीय कागदपत्रांशिवाय बँकेतून अवघ्या दोन ते पाच हजार रुपयांमध्ये आधार कार्ड देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात कांदिवली पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे एका मुस्लिम व्यक्तीला हिंदू नावाने आधार कार्ड तयार करून दिल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोईसर परिसरातून अटक करण्यात आली. कांदिवलीच्या बँक ऑफ बडोदा शाखेत कागदपत्रांशिवाय आधार कार्ड बनवण्याचे काम केले जात असल्याची तक्रार कांदिवली पोलिसांकडे आली होती.

कांदिवलीतील महेंद्र मनगुडे नामक व्यक्ती कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवघ्या दोन ते पाच हजार रुपयांमध्ये आधार कार्ड बनवून देत होता. उपनिरीक्षक प्रकाश घाडगे यांनी एका मुस्लिम व्यक्तीला आरोपी महेंद्रकडे ग्राहक म्हणून पाठवले. दोन हजार रुपये घेऊन महेंद्रने त्याला बँक ऑफ बडोदाच्या शाखेत नेले. तिथे कोणतीही चौकशी न करता मोहम्मद जुनैदचे आधार कार्डसाठी राम गुप्ता यांच्या नावाने नोंदणी करण्यात आली, तसेच त्याबाबतची चिठ्ठीही देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी कारवाई करत महेंद्रला अटक करत त्याच्याकडून काही राजकीय पक्षांचे रबरस्टॅम्प आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच त्याने आतापर्यंत अनेक जणांना अशा प्रकारे आधार कार्ड दिल्याचे कबुल केले. तसेच त्याच्यासोबत आणखी या गुन्ह्यांत गुंतले आहे का, याचा पोलिस तपास करत आहे.

बँक ऑफ बडोदाच्या कांदिवली शाखेतून आरोपी महेंद्र हा बनावट आधार कार्ड बनवून देत असल्याचे तपासात पुढे आले. या प्रकरणात आणखी कोणी गुंतले आहे का, याचा तपास सुरू आहे.
- सदाशिव सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कांदिवली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94494 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..