पुण्यातून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त
पुण्यातून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त

पुण्यातून भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : गौरी-गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तुपाचा (डालडा) वापर मोठ्या प्रमाणात होतो, परंतु मानवी आरोग्यास धोकादायक वनस्पती तुपाची विक्री करणारी साखळी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पकडली आहे. बेकरीची नियमित तपासणी करताना तेथे वापरण्यात येणाऱ्या वनस्पती तुपाचे नमुने घेण्यात आले होते. पुण्यातील आरोग्य प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली असता हे वनस्पती तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट झाल्याचे ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी सांगितले.
पुण्यातील प्रयोगशाळाने सोमवारी (ता. २२) तपासणी अहवाल पाठवला. त्यानंतर तातडीने वनस्पती तुपावर कारवाई करण्यात आली. तुपाचे घाऊक विक्रेते आणि वितरक यांच्याकडील तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. मार्केट यार्डमधील घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करून तेथील तुपाचे वनस्पती नमुने घेण्यात आले. तसेच १,२८८ किलो तुपाचा ३,००,५२९ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सेंचुरी पफचा ४,३८,९६६ रुपयांचा ५३ किलो रुपयांचा माल जप्त केला.
घाऊक व्यापाऱ्यांकडून एकूण ७,३८, ४९७ रुपये किमतीचे तूप जप्त करण्यात आले. त्यानंतर वितरकांकडूनही ३,१९, ८८५ रुपयांचे तूप जप्त केले. हे तूप तमिळनाडूमधून पुण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला दिल्याचेही नारागुडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94499 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..