तारापूर औद्योगिक वसाहतीत तरुण अभियंत्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारापूर औद्योगिक वसाहतीत तरुण अभियंत्याचा मृत्यू
तारापूर औद्योगिक वसाहतीत तरुण अभियंत्याचा मृत्यू

तारापूर औद्योगिक वसाहतीत तरुण अभियंत्याचा मृत्यू

sakal_logo
By

बोईसर, ता. २५ ः तारापूर औद्योगिक वसाहतीमधील पोलाद उत्पादक कंपनीत तरुण अभियंत्याच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक गायकवाड (वय २४) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी विराज कंपनीच्या फोर्जिंग विभागात त्याचा मृतदेह आढळून आला होता. बोईसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बोईसरलगतच्या पास्थळ येथील आत्मशक्तीनगर येथे राहणारा प्रतीक हा तरुण अभियंता वर्षभरापासून औद्योगिक वसाहतीमधील विराज प्रोफाईल कंपनीत सीएनसी ऑपरेटर म्हणून काम करीत होता. बुधवारी तो रात्रपाळीत कामावर गेला होता. गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास कंपनीच्या फोर्जिंग विभागात तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला होता. बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बोईसर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. प्रतीकच्या मृत्यूवर त्याच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी बोईसर पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94504 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..