तलासरीत गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरीत गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप
तलासरीत गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप

तलासरीत गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप

sakal_logo
By

कासा (बातमीदार) : तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयातील कनिष्ठ व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना समता फाऊंडेशनच्या वतीने व रोटरी क्लब मुंबई यांच्या अर्थसाह्यातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या हस्ते ४० सायकलचे वाटप करण्यात आले. समता फाऊंडेशनचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या प्रयत्नातून आदिवासी भागात संगणक लॅब, शिवण क्लास वर्ग व अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात समता फाऊंडेशनचे अभ्यास केंद्र असून यामार्फत शेकडो विद्यार्थ्यांना शिलाई मशीन, सायकल, संगणक शिक्षण अशा सुविधा प्राप्त झाल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपूत यांनी रोटरी क्लबचे आभार मानले. समता फाऊंडेशन व रोटरी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी आशा व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94513 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..