वसईतील रस्त्यावरील खड्ड्यात फसली कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईतील रस्त्यावरील खड्ड्यात फसली कार
वसईतील रस्त्यावरील खड्ड्यात फसली कार

वसईतील रस्त्यावरील खड्ड्यात फसली कार

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २५ (बातमीदार) : वसई-विरार-नालासोपारा परिसरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. वसई पूर्वेतील वालीव फाटा मुख्य रस्त्यावरील एका खड्ड्यात गुरुवारी (ता. २५) कारचे चाक अडकल्याने ती टोचनचा आधार देऊन बाहेर काढावी लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
गणेशोत्सव पूर्वी सर्व खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. खड्डे बुजवण्याचे कामही सुरू आहे. मात्र दर्जावर शंका उपस्थित केली जात आहे. वालीव, वालीव नाका, नवजीवन, गावराई पाडा, सातिवली, भोयदापाडा, एव्हरशाईन, नालासोपारा पूर्व धणीवबाग, बिलालपाडा, संतोष भुवन, जीवदानी रोड, विरार ते विरार फाटा रोड, नारंगी, साईनाथ या परिसरात खड्डे असून अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94522 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..