तुटपुंज्या पगारात घर कसे चालवायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुटपुंज्या पगारात घर कसे चालवायचे?
तुटपुंज्या पगारात घर कसे चालवायचे?

तुटपुंज्या पगारात घर कसे चालवायचे?

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांची रखडलेली वेतनवाढ एका महिन्यात देण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन कामगारमंत्र्यांनी दिले होते; परंतु अनेक महिने उलटले तरी त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महागाईमुळे तुटपुंज्या पगारात घर कसे चालवायचे, असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे. सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ लवकरात लवकर होण्यासंदर्भात सरकारने निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘माय बळिराजा सुरक्षा रक्षक वाहनचालक संघटने’कडून देण्यात आला आहेत.

‘माय बळिराजा सुरक्षा रक्षक वाहनचालक संघटने’चे कार्याध्यक्ष अभिलाष डावरे यांनी सांगितले, की तत्कालीन कामगार मंत्र्यांशी अनेक संघटनांचे पदाधिकारी, कामगार आयुक्त आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेऊन महत्त्वाच्या विषयावर वाटाघाटी केल्या गेल्या. तेव्हा मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांची रखडलेली वेतनवाढ एका महिन्यात देण्याबाबत आश्वासनही देण्यात आले होते; परंतु अनेक महिने उलटले तरी त्याबाबत काहीच झालेले नाही. दुसरीकडे खर्च करून मंडळातील सुरक्षा रक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याची निविदा खासगी कंपनीला देण्यात आली आहे. याचा अर्थ मंडळाचा पैसा वाया घालवणार का? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजच्या घडीला महागाईच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ होणे आवश्यक होते. परंतु असे न करता त्यांना प्रशिक्षण केंद्र उघडून दिले. मग वेतनवाढीचा मुद्दा का मान्य केला गेला नाही? खर्चिक गोष्टी कोणाच्या अधिपत्याखाली ठररवल्या जातात? असे प्रश्न डावरे यांनी उपस्थित केले. आजवर आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. लवकरात लवकर वेतनवाढ करण्यात आली नाही, तर येत्या दिवसांत सुरक्षा रक्षकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही डावरे यांनी सरकारला दिला आहे.

कोरोनामुळे आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. त्यातच महागाईही वाढली. मुलांचे शिक्षणाचे शुल्क कसे भरायचे, घरभाडे कसे द्यायचे, कुटंब कसे चालवायचे, आरोग्य खर्च कसा करायचा इत्यादी अनेक प्रश्न आम्हाला पडले आहेत. सरकारला आमची विनंती आहे, की तात्काळ वेतनवाढ करावी.
- नितीन शेंडगे, सुरक्षा रक्षक, मुंबई

करार संपून अनेक वर्षे उलटूनही आम्हाला वेतनवाढ मिळालेली नाही. माझ्या कुटुंबीयांना महागाईमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. घरभाडे, प्रवास खर्च आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी पैसा कुठून आणावा याचे उत्तर सरकारने द्यावे.
- स्वाती बोराडे, महिला सुरक्षा रक्षक, मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94523 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..