मुंबईतील फेरीवाला धोरणावरील स्थगिती हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील फेरीवाला धोरणावरील स्थगिती हटवा
मुंबईतील फेरीवाला धोरणावरील स्थगिती हटवा

मुंबईतील फेरीवाला धोरणावरील स्थगिती हटवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ता. २५ - मुंबईत फेरीवाला धोरणावर असलेली स्थगिती हटविण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. आमदार अमित साटम यांनी फेरीवाला धोरणाच्या निमित्ताने विचारलेल्या लक्ष्यवेधीला उत्तर देताना त्यांनी हे आदेश राज्य सरकारला दिले. त्यावर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठक लावून यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले. 
मुंबईतील फेरीवाला धोरणाअंतर्गत १ लाख २८ हजार परवानाधारक फेरीवाल्यांना परवाना मंजूर करण्यात आला होता. परंतु दर पाच वर्षांनी वारंवार फेरीवाला धोरणाअंतर्गत सर्वेक्षणाचा विषय येतो, असाही मुद्दा त्यांनी मांडला. याआधीच्या धोरणानुसार परवाने मंजूर करूनही हॉकिंग पिचेससाठी फेरीवाला क्षेत्रात त्यांचे पुनर्वसन रोखण्यात आले. याआधीच्या महाविकास आघाडी सरकारनेच या धोरणावर स्थगिती आणली होती. त्यामुळे ही स्थगिती हटवण्याची मागणी अमित साटम यांनी आज विधानसभेत केली. 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या विषयावर बोलताना टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सने केलेल्या सर्वेक्षणाचा संदर्भ दिला. त्यावेळी पात्रता निश्चिती होऊनही या फेरीवाल्यांना हॉकिंग पिचेसच्या ठिकाणी जागा मिळू शकलेली नाही. अनेक वर्षे होऊनही हॉकिंग झोन शिफ्ट करत नाही. त्यामुळेच त्वरीत निर्णय घेऊन पिचेस देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश नार्वेकर यांनी दिले. त्यावर राज्य सरकारकडून दीपक केसरकर यांनी उत्तर देताना सांगितले की, या विषयाच्या अनुषंगाने पात्रतेनुसारच कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच स्थगिती हटवण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावण्यात येईल, असेही केसरकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94526 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..