मुंबईत २.९० कोटींचे ड्रग्स जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत २.९० कोटींचे ड्रग्स जप्त
मुंबईत २.९० कोटींचे ड्रग्स जप्त

मुंबईत २.९० कोटींचे ड्रग्स जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : मुंबई पोलिसांनी गुरुवारी मानखुर्द परिसरातून दोन नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून २.९० कोटी रुपयांचा मेफेड्रोन एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. मायकेल चुकवुमा (३४), ओझोकवेसिरी ओकेचुकवू (४६) अशी दोघांची आहेत. दोघांना न्यायालयाने ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी सेलच्या वांद्रे पथकाने गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास पनवेलकडे महामार्गावरील पॉवर स्टेशनजवळ दोन जणांना ताब्यात घेतले. कारवाईत दोघांकडून १.४ किलोग्रॅम मेफेड्रोन एमडी जप्त केले. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांपैकी एक जण २०१६ मध्ये पालघरमधील तुळींज येथील हत्येमधील आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94529 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..