अखेर रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू....
अखेर रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू....

अखेर रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू....

sakal_logo
By

मालाडमधील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू
मालाड, ता. २५ (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक सहामधील ज्युलियस वाडी रस्त्याचे काँक्रीटीकरण अखेर सुरू करण्यात आले आहे. २२ ऑगस्ट रोजी ‘सकाळ’मध्ये ज्युलियस वाडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालिकेने काँक्रीटीकरण सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत होते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे दुर्लक्ष होत होते. ज्युलियस वाडी व आजूबाजूच्या परिसरात दोन शाळा, पालिकेचे दोन दवाखाने आणि जवळपास पाच हजार लोकवस्ती असूनही रस्ता दुर्लक्षित होता. रस्त्यावर खड्डे व डबके तयार झाले होते. त्याबाबतचे वृत्त आल्यानंतर दोन दिवसांत रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94539 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..