बस - ट्रक अपघातात ८ विद्यार्थी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस - ट्रक अपघातात ८ विद्यार्थी जखमी
बस - ट्रक अपघातात ८ विद्यार्थी जखमी

बस - ट्रक अपघातात ८ विद्यार्थी जखमी

sakal_logo
By

वाडा, ता. २६ (बातमीदार) ः बसला ट्रकने धडक दिल्याने जोरदार अपघात झाल्याची घटना वाडा-मनोर मार्गावर सापने गावच्या हद्दीत घडली. यात आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (ता.२६) सकाळी घडली. रोहित वाघात (वय १७), मनस्वी पाटील (वय १६), सानिका पाटील (१७), अस्मिता सुरूम (१८), ममता गोंड (१८), भूमिका वावरे (१८), निकिता धानवा (१७), दीपाली वाघात (१७) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
वाडा आगाराची वाडा-बास्ते ही बस शुक्रवारी सकाळी बास्ते गावातून प्रवासी घेऊन परतत होती. बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थी होते. ही बस सापने थांब्यावर प्रवाशांना घेण्यासाठी थांबली असता मागून येणाऱ्या ट्रकने (एक्स ८६१८) जोराची धडक दिली. यात बसचे बरेच नुकसान झाले; पण प्रवाशांपैकी कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती आगारप्रमुख मधुकर धांगडा यांनी दिली. ट्रकचाचालक धमेंद्र यादव याला वाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94565 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..