रायपूर येथे नदीतून अंत्ययात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायपूर येथे नदीतून अंत्ययात्रा
रायपूर येथे नदीतून अंत्ययात्रा

रायपूर येथे नदीतून अंत्ययात्रा

sakal_logo
By

कासा, ता. २६ (बातमीदार) ः नदीच्या पल्याड स्मशानभूमी असल्याने नदीच्या पात्रातून अंत्ययात्रा न्यावी लागल्याची घटना तालुक्यातील रायपूरमध्ये घडली. काही दिवसांपूर्वीच बोरमाळ येथेही असाच प्रकार समोर आला होता. रायपूर येथे गंगीबाई पिल्या गवळी (वय ९०) यांचे सोमवारी (ता. २२) निधन झाले. नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांना नदीपात्रात उतरूनच अंत्ययात्रा स्मशानापर्यंत न्यावी लागली. त्यामुळे आता तरी नदीवर पूल बांधून देण्यात यावा, तसेच इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गावकरी करत आहेत.

रायपूर येथे स्मशानभूमी नदीच्या पलिकडे आहे. पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने पलिकडे जाण्यात अडचणी येतात. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. तसेच, गावात स्मशानभूमीला शेड नसल्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. रायपूर गावाच्या दोन्ही बाजूने नदी वाहते. या नदीच्या पलीकडे गवळीपाडा, माढापाडा, कालात पाडा आणि कातकरी वस्ती आहे. गवळीपाड्यातील नागरिकांना मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी चिखलाचा रस्ता तुडवत यावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने आता तरी येथील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94566 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..