गणेशोत्सवाच्या तोंडावर गॅस सिलेंडरचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या तोंडावर गॅस सिलेंडरचा तुटवडा
गणेशोत्सवाच्या तोंडावर गॅस सिलेंडरचा तुटवडा

गणेशोत्सवाच्या तोंडावर गॅस सिलेंडरचा तुटवडा

sakal_logo
By

वाडा, ता. २६ (बातमीदार) ः तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. नंबर लावल्यानंतर दहा-बारा दिवस सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे ऐन गणपतीच्या दिवसांत नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. सिलिंडर नसल्याने लोकांना पुन्हा एकदा चुली पेटवण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाडा शहरातील आर. डी. पातकर गॅस एजन्सीकडून तालुक्यात एच. पी. सिलिंडर गॅसचा पुरवठा केला जातो. या एजन्सीमार्फत पूर्ण तालुक्यात गॅसचे वितरण केले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो ग्राहकांनी नोंदणी करून ठेवली असतानाही त्यांना दहा दिवसानंतरही गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामीण भागात नागरिक चूल पेटवतात; पण शहरी भागात चूल पेटवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने त्यांनी काय करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुडूस परिसरात ३२५ ते ३५० गॅसची नोंदणी झाली असून या ग्राहकांना गॅस मिळायला उशीर होत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गणपती सणापूर्वी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.


यासंदर्भात आर.डी.पातकर गॅस एजन्सीचे मालक सौरभ पातकर यांच्याशी संपर्क साधला असता गणपती सणामुळे गॅसची मागणी अचानक वाढली असे त्यांनी सांगितले. मागणीच्या मानाने पुरवठा होत नसल्याने गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. येत्या तीन चार दिवसात पुरवठा सुरळित होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात नायब तहसीलदार सुनिल लहांगे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित एजन्सीला तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या असून गणपती सणापूर्वी सर्वांना गॅस मिळेल याची दक्षता घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मी गेल्या अनेक दिवसांपासून सिलिंडर गॅसची नोंदणी केली आहे. मात्र मला गॅस मिळत नाही, असे येथील नागरिक वसंत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94568 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..