स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत १६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ४५८ वर पोहोचली आहे.

दिवसेंदिवस स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढत होत असल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सण उत्सवाच्या काळात वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे सावट निर्माण झाले आहे. २२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या ४२२ झाली; तर १४ रुग्ण दगावले असल्याची नोंद करण्यात आली होती; पण नव्याने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आला नाही, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. सध्या जिल्ह्यात १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ठाणे १२०, कल्याण -डोंबिवली ३२, नवी मुंबई तीन, बदलापूर दोन आणि ठाणे ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.


--

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94577 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..