प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजारांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजारांचा दंड
प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजारांचा दंड

प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजारांचा दंड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावर खड्डे खोदून मंडप टाकणाऱ्या मंडळांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असून, पालिकेच्या या निर्णयावर गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल १२ हजार गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांकडून मोठ्या आकाराचे मंडप रस्त्यावरच उभारण्यात येतात. त्यात अंतर्गत डांबरी रस्त्यांवर मंडप उभारण्याचा मोठा ट्रेंड आहे. अनेकदा रस्त्यांवर खड्डे पाडल्यानंतर गणेशोत्सव मंडळांकडून ते पुन्हा बुजविण्यात येत नाहीत. त्यामुळेच हे खड्डे पुढे आणखी मोठे होत जातात. रस्त्यांची आणखी दुरवस्था होण्यात हे खड्डे कारणीभूत ठरत असल्याने अशा मंडळांवर प्रत्येक खड्ड्यासाठी दंड आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही गणेशोत्सव मंडळांना पालिकेने दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच प्रत्येक खड्ड्यामागे दंड आकारण्याचे निर्देश आहेत. त्यामुळेच मंडळांनाही जबाबदारीने पालिकेच्या निर्देशाचे पालन करावे लागेल, अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली.

३,३१२ मंडळांचेच अर्ज
मुंबई महापालिकेकडे विविध परवानग्यांसाठी गणेशोत्सव मंडळांनी मुदतवाढीची मागणी केली होती. पालिकेने ही मुदत २६ ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यानुसार पालिकेने २,०४३ मंडळांना विविध परवानग्या दिल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज येणे अपेक्षित होते; परंतु १२ हजार मंडळांपैकी अवघ्या ३,३१२ मंडळांनीच परवानग्या घेण्यासाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94581 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..