अंमली पदार्थासह नायजेरियन नागरिक अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंमली पदार्थासह नायजेरियन नागरिक अटक
अंमली पदार्थासह नायजेरियन नागरिक अटक

अंमली पदार्थासह नायजेरियन नागरिक अटक

sakal_logo
By

पनवेल, ता. २६ (वार्ताहर) : एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी तळोजा भागात आलेल्या अँन्थोनी नैईमेका ओकोली (वय ३४) या नायजेरीयन नागरिकाला तळोजा पोलिसांनी गुरुवारी (ता.२५) मध्यरात्री सापळा लाऊन अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी नायजेरीयन नागरिकाकडून तब्बल ८ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे एमडी हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, सहायक पोलिस उप निरीक्षक नरेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अँथोनी ओकोली हा नायजेरियन नागरिक तळोजा फेज १ मधील शंकर मंदिराच्या मागील भागात रात्रीच्या सुमारास एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शंकर मंदिराजवळ सापळा रचला. मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास आरोपी त्याठिकाणी संशयास्पदरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्याकडे ४०.५० ग्रॅम व १७ ग्रॅम वजनाचे भुरकट रंगाची मेफेड्रॉन पावडर सापडली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94607 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..