पोलिस आयुक्तांचा फोटो वापरून फसवणुकीचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्तांचा फोटो वापरून फसवणुकीचा प्रयत्न
पोलिस आयुक्तांचा फोटो वापरून फसवणुकीचा प्रयत्न

पोलिस आयुक्तांचा फोटो वापरून फसवणुकीचा प्रयत्न

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने समाजमाध्यमावरून अज्ञात व्यक्ती गिफ्टची मागणी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची पोस्ट गेल्या काही दिवसांपासून फिरत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस कारवाई करत असून, पोलिसांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात गिफ्टची मागणी झाल्यास प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. आयुक्तांच्या फोटोच्या साह्याने समाजमाध्यमावरून लवकरात लवकर गिफ्ट देण्याची विनंती अनोळखी व्यक्ती करत आहे. ९३२९६०३२९४ या क्रमांकावरून हा संदेश येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘मी सध्या अतिशय महत्त्वाच्या बैठकांमध्ये अडकलो आहे. मला तातडीने मदत हवी आहे. सध्या माझ्याकडे कोणतेही कार्ड नाही. तुम्ही किती वेळात या गिफ्ट कार्ड्सची व्यवस्था करू शकता, मला ती तासाभरात पाठवायची आहेत. मी दिवस संपायच्या आत तुम्हाला त्याचे पैसे परत करेन, अशा स्वरूपाचे बोगस संदेश अनेकांना केले जात आहेत. या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94608 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..