फ्रेंडशिप क्लबद्वारे फसवणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्रेंडशिप क्लबद्वारे फसवणारा अटकेत
फ्रेंडशिप क्लबद्वारे फसवणारा अटकेत

फ्रेंडशिप क्लबद्वारे फसवणारा अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : समाज माध्यमाद्वारे ‘फ्रेंडशिप क्लब’च्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या भामट्याला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून अटक केली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अभिषेक दयाशंकर सिंग (२९) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. अभिषेक ‘गीता फ्रेंडशिप क्लब’ चालवून पुरुषांना महिलांशी शारीरिक संबंधांचे आश्वासन देऊन पैसे उकळायचा. या संदर्भात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अभिषेकचा मोबाईल नंबर ट्रेस केला. त्यात तो उत्तर प्रदेशात असल्याचे समोर आले. पोलिसांनी पथक नेमून त्याला मिर्झापूर येथून अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94611 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..