मेट्रो कारशेडप्रकरणी चर्चेस तयार : फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो कारशेडप्रकरणी चर्चेस तयार : फडणवीस
मेट्रो कारशेडप्रकरणी चर्चेस तयार : फडणवीस

मेट्रो कारशेडप्रकरणी चर्चेस तयार : फडणवीस

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : मेट्रो कारशेड तेथेच बांधण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. हा प्रकल्प पुढे ढकलला जात असल्याने मुंबईकरांचे नुकसान होते आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी पुढे यावे, आम्ही चर्चेस तयार आहोत, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गुरुवारी (ता. २५) विधानपरिषदेत फडणवीसांनी केलेल्या या आवाहनाला `वनशक्ती` स्वयंसेवी संस्थेचे स्टालिन यांनी प्रतिसाद दिला आहे. कोणत्याही सार्वजनिक मंचावर फडणवीसांनी चर्चेचे आमंत्रण द्यावे, अन जनतेसमोर प्रकल्पासाठी पर्यावरणाचा अकारण ऱ्हास होतो आहे काय याचा आढावा घ्यावा. त्यांनी त्यांची बाजू सांगावी, आम्ही आमची सांगू असे स्टालिन म्हणाले. न्यायालयाने आम्ही उत्तम हेतुने काम करतो आहोत, असे नमूद केले आहे याकडे लक्ष वेधत स्टालिन म्हणाले, आमच्या संस्थेला निधी कोठून मिळतो वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देण्यास तयार आहोत. मात्र ही चर्चा बंद खोलीत नको तर सार्वजनिक मंचावर हवी, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94616 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..