कल्याणमध्ये आज बामसेफचे अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये आज बामसेफचे अधिवेशन
कल्याणमध्ये आज बामसेफचे अधिवेशन

कल्याणमध्ये आज बामसेफचे अधिवेशन

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : बामसेफचे ३६ वे राज्यस्तरीय अधिवेशन कल्याण येथे २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या अधिवेशनास बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातील ३६ जिल्ह्यातून बामसेफचे जवळपास दोन हजार प्रतिनिधी कार्यकर्ते या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती बामसेफ ठाणे जिल्हा अध्यक्ष राहुल खैरे यांनी दिली.

बामसेफचे ३६ वे अधिवेशन कल्याणमधील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साई नंदन हॉटेलच्या टेरेस हॉलमध्ये सकाळी ११ ते रात्री ९.३० यादरम्यान होणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याची माहिती देण्यासाठी बामसेफच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष संजय धाबर्डे यांच्यासह भारतीय मुक्ती मोर्चाचे काम पाहणारे संजय डिंपे आणि बामसेफचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश देशमुख, बामसेफ ठाणे जिल्हा अध्यक्ष राहुल खैरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94622 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..