शिक्षणासाठी चिखलातून पायवाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणासाठी चिखलातून पायवाट
शिक्षणासाठी चिखलातून पायवाट

शिक्षणासाठी चिखलातून पायवाट

sakal_logo
By

उरण, ता. २७ (वार्ताहर) ः स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासींच्या वाड्या-वस्त्यांवर रस्ता नसल्याने आजही चिरनेरसारख्या ऐतिहासिक गावातील आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागत आहे. शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणावर गदा आल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
इंग्रज सत्तेविरुद्ध १९३० मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात चिरनेर गावातील आठ शूरवीरांना हौतात्म्य आले होते. त्यात नाग्या कातकरी हा कातकरी आदिवासी तरुण हुतात्मा झाला होता; मात्र त्याच्या वारसांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कातकरी आदिवासी समाजाची मोठी वस्ती आहे; मात्र चिरनेर ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे या आदिवासी वाड्यांपर्यंत अजूनही पक्का रस्ता होऊ शकला नाही. परिणामतः या आदिवासींना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. केळाचा माळ या आदिवासी वाडीवरील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी दगड-मातीच्या रस्त्यातून चिखल तुडवत दररोज तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे चिरनेर ते केळाचा माळ आदिवासी वाडीपर्यंतच्या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून सुमारे १३ लाखांचा निधी मंजूर झाला होता; मात्र ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या उदासीन कारभारामुळे या रस्त्याचे काम होऊ शकले नाही. याबाबत आदिवासी समाजाने वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतापाची भावना आहे.
----
केळाचा माळ आदिवासी वाडी रस्त्यासाठी जीपचा निधी मंजूर झाला असला, तरी काही तांत्रिक बाबींमुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. सध्या आदिवासी विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्याचा त्रास होत आहे. लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल.
- महेश पवार, ग्रामविकास अधिकारी, चिरनेर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94623 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..