बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी साठी एपीएमसी मध्ये गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी साठी एपीएमसी मध्ये गर्दी
बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी साठी एपीएमसी मध्ये गर्दी

बाप्पाच्या आगमनासाठी खरेदी साठी एपीएमसी मध्ये गर्दी

sakal_logo
By

तुर्भे, ता. २७ (बातमीदार): मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व कोकणात गणेशोत्सवाला जत्रेचे स्वरूप येते. दरवर्षी गणेशोत्सवासाठी प्रत्येक जण जून महिन्यापासून खरेदी, सजावटीसाठी पैसे साठवण्याचे प्लॅनिंग करत असतो. याच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन तोंडावर आले असताना यंदा बाजारपेठा सजल्या आहेत.
कोरोनाच्या या संकटात सण अगदी साधेपणाने साजरे करावे लागले होते. मात्र, आता सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत नवी मुंबईसह, मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, उरण व रायगड येथून नागरिक खरेदीसाठी येत आहेत. प्लास्टिक व थर्माकोल बंदीमुळे आकर्षक मखरांची जागा कागदी पुठ्ठे व कापडी मखरांनी घेतली आहे. मखर विक्रेत्यांनी लागलीच ही नवी कल्पना अवलंबून मखर बनवले आहेत. यात लाकडी गोलाकार पट्ट्या बनवत आकर्षक प्लास्टिकच्या रंगीबेरंगी फुलांची माळ लावण्यात आली आहे; तर अनेकांनी लाकडी मोगलाई, राजस्थानी नक्षी व कलाकुसर केलेले कायमस्वरूपी मखर बनवून घेतलेले पाहायला मिळत आहेत. घरातील गणेशासाठी डेकोरेटिव्ह कागदी फुले, फुलांच्या माळाही बाजारात दिसत आहेत. यात बाप्पाचे आवड असलेले जास्वंद, कमळ यासह झेंडू, मोगरा, गुलाब अशा विविध प्रकारची फुले व माळा दिसत आहेत.

रोषणाईसाठी विविध पर्याय
लाईटच्या माळादेखील दुकानांत दिसत आहेत. गणपतीचे आगमन होताना शास्त्र म्हणून बाप्पाच्या खांद्यावर टाकून व बाप्पाचे मुख झाकून आगमन होते. त्यासाठी लागणारे सोनेरी व चंदेरी जरतारी नक्षी असलेले लाल, निळे, हिरवे, जांभळे, गुलाबी, पिवळे शेले घेण्यासदेखील झुंबड उडालेली पाहण्यास मिळत आहे. यासह आकर्षक जानवे, मोत्यांच्या कंठ्या लक्ष वेधून घेत आहेत. गणपतीसाठी रोषणाईसाठी तोरणे, मखरावर लावण्यात येणाऱ्या माळा व डेकोरेशनसाठी सोडण्यात येणारी विविध तोरणे बाजारात आली आहेत. यात संगीतावर चालणारी तोरणेदेखील आहेत. बाप्पासाठी लागणारे पाट, सोनेरी व चंदेरी नक्षीदार कागददेखील बाजारात पाहण्यास मिळत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94635 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..