माणुसकीच्या भिंतीवर बेघरांचा कब्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणुसकीच्या भिंतीवर बेघरांचा कब्जा
माणुसकीच्या भिंतीवर बेघरांचा कब्जा

माणुसकीच्या भिंतीवर बेघरांचा कब्जा

sakal_logo
By

माणुसकीच्या भिंतीवर बेघरांचा कब्जा
घणसोली विभागातील प्रकार; पालिकेचे दुर्लक्ष
घणसोली, ता. २७ (बातमीदार) ः घणसोली विभागात महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत गरजूंना आवश्यक असलेल्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम हाती घेतला होता. पण या माणुसकीच्या भिंतीवर पदपथांवर राहणाऱ्या बेघरांनी कब्जा केला असून महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या उपक्रमालाच हरताळ फासला आहे.
नवी मुंबई महापालिकेमार्फत बेघर व गरजू लोकांसाठी सुरू केलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. गरजू लोकांना कपडे, शैक्षणिक व इतर स्वरूपात मदत मिळावी, यासाठी नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हा उपक्रम हाती घेतला होता. पण नवी मुंबईत सर्वत्र उभारलेल्या या स्टॅण्डचा आता गैरवापर होत आहे. घणसोली-शिळफाटा उड्डाण पुलाखाली देखील महापालिकेच्यावतीने अशाच स्टँडची उभारणी केली आहे, या परिसरात उड्डाण पुलाखाली काही लोकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता केली आहे. तसेच रात्री निवारा म्हणूनदेखील या स्टॅण्डचा वापर केला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमाचा उद्देशच फोल ठरत आहे.
--------------------------------
गरजूंसाठी मदत व्हावी, या उद्देशाने पालिकेने हा उपक्रम राबविला होता. पण त्याचा वापर अशा प्रकारे होत असेल तर संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
- संजय पाटील, स्वच्छता अधीक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94637 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..