गणेशोत्सवाला कृत्रिम फुलांशी आरस आकर्षक , नागरिकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाला कृत्रिम फुलांशी आरस आकर्षक , नागरिकांची मागणी
गणेशोत्सवाला कृत्रिम फुलांशी आरस आकर्षक , नागरिकांची मागणी

गणेशोत्सवाला कृत्रिम फुलांशी आरस आकर्षक , नागरिकांची मागणी

sakal_logo
By

शिल्पा नरवाडे ः जुईनगर
दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, त्या अनुषंगाने नवी मुंबईतील दुकानांमध्ये कृत्रिम फुलांपासून वेगवेगळे नक्षीकाम केलेल्या विविधारंगी फुलांचे नानाविध प्रकार विक्रीसाठी आले आहेत. गणेशोत्सवासाठी बाजारात प्लास्टिक तसेच लाकडापासून बनविलेल्या फुलांचे बुके, फ्लॉवर पॉट, फ्लॉवर ट्री, फ्लॉवर स्टँड, फुलांचे तोरण, फुलांचे हार उपलब्ध असून बाप्पाच्या सजावटीसाठी या कृत्रिम फुलांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
गणेशोत्सवाला काही दिवसांचा अवधी शिल्ल्क असल्याने बाजारात खरेदीला उधाण आले आहे. यंदा, निर्बंधमुक्त सण साजरे होणार असल्याने प्रत्येक जण गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहे. यासाठी बाजारातदेखील विविध पर्याय उपलब्ध असून हवीतशी सजावट करण्यासाठी साहित्य बाजारात दाखल झाले आहे. यात आरास करण्यासाठी कृत्रिम फुलांच्या वेणी, वेगवेगळ्या रंगांमधील फुलांच्या माळा, वेगवगेळ्या रंगेबेरंगी फुलांच्या तोरणांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कृत्रिम फुलांची ही आरास आकर्षक असून हिरव्या पानांमध्ये जास्वदींची लाल फुले खुलून दिसत आहेत. बाजारात कृत्रिम फुलांची आरास करण्यासाठी तीन हजारांपासून विविध पर्याय गणेशभक्तांसाठी उपलब्ध आहेत.

कोट
कृत्रिम फुलांची आरास आकर्षक ठरत असून ग्राहक चांगली पसंती देत आहेत. ही आरास खराब झाल्यानंतर स्वच्छ धुऊन पुन्हा वापरता येते.
- रावेची दुकानदार, जुईनगर

फुलांची केलेली आरास सुकून जाते, त्यापेक्षा कृत्रिम फुलांची आरास दिसायला सुंदर आहे. खराबदेखील होत नाही. त्यामुळे ही आरास चांगला पर्याय आहे.
-साई बरहाटे, खरेदीदार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94639 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..