लाडक्या बाप्पाला सोन्या चांदीचा थाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाडक्या बाप्पाला सोन्या चांदीचा थाट
लाडक्या बाप्पाला सोन्या चांदीचा थाट

लाडक्या बाप्पाला सोन्या चांदीचा थाट

sakal_logo
By

तुर्भे, ता.२८ (बातमीदार): दोन वर्षे कोरोनामुळे प्रत्येक सण साधेपणाने साजरे केले गेले. त्यामुळे दर वर्षी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांची दागिन्यांची असणारी मागणी तुलनेने अर्ध्यापेक्षाही कमी झाली होती. पण यंदा गणेशोत्सवात बाप्पांचा थाट वाढवणार असून सोन्या-चांदीच्या अलंकारांना मागणी वाढली आहे.
लाडक्या गणरायाचे ३१ ऑगस्टला आगमन होत आहे. त्याच्या स्वागतासाठी अबाल-वृद्ध आतुरले असून, गणरायाच्या आदरातिथ्यात कमी राहू नये, यासाठी सोन्या-चांदीचे अलंकार, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविक पसंती देत आहेत. लाडक्या बाप्पाच्या पूजेसाठी चांदीच्या वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठादेखील सजल्या असून लहान-मोठ्या आकारांची चांदीच्या गणेश मूर्तीपासून विविध प्रकारचे अलंकार विक्रीसाठी आले आहेत. त्यात सोन्याचा मुलामा असलेल्या दागिन्यांची भुरळ गणेशभक्तांना पडली आहे. तसेच चांदीच्या धातूतील सुकामेव्याचा नैवेद्य, पूजा साहित्य व आभूषणांचा एकत्रित संच असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

१५ हून अधिक मुकुटांचे प्रकार
गणपती आणि गौरीसाठी विविध आकारांतील १५ हून अधिक मुकुटांचे प्रकार, कमळहार, चक्रीहार, बाळी, २१ , ११ किंवा ७ मोदकांचा संच, सोन्याचा मुलामा असलेला मोदक, चांदी व सोन्यातील गणरायाचा शेला, रामराज्य तोडे, उंदीर, परशू, जाणवे, सुपारी, विड्याचे पान, केवड्याचे पान, केळीचे पान, केळी, जास्वंद, कंठीमाळ अशी विविध आभूषणे उपलब्ध आहेत. याशिवाय चांदीच्या वस्तूंमध्ये दुर्वा, तुळस, तुळशी वृंदावन, निरांजन, दिवा, पंचपाळे, बाजूबंद, पाट, ताम्हण, गडवा, पेला, तक्क्या, पळी यांसारख्या वस्तूंना ग्राहकांची पसंती आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94640 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..