बाप्पाच्या नैवेद्याला डिझायनर साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या नैवेद्याला डिझायनर साज
बाप्पाच्या नैवेद्याला डिझायनर साज

बाप्पाच्या नैवेद्याला डिझायनर साज

sakal_logo
By

बैठकीची सजावट, त्यामध्ये ठेवलेला ड्रायफ्रूट मोदक... चॉकलेटचे द्रोण आणि पाकळ्यांमध्ये हळूच डोकावणारा मोदक... कुठे फुलांच्या आकाराची सजावट तर कुठे एखादी सुबक रांगोळी भासावी असे कोरीव काम केलेले मोदक... यंदा बाप्पाच्या नैवेद्याला असा डिझायनर लूक देणाऱ्या मोदकांची रेलचेल मिठाई बाजारात दिसत आहे. काजू, बदाम, अंजीर, खजूर, पिस्ता यासह सुक्यामेव्याचा वापर करून बनवलेल्या या मोदकांना मागणीही वाढत आहे.
बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असल्याने त्याच्या स्वागतासाठी लगबग वाढली आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ठाण्याच्या मिठाई दुकानांमध्ये भाविकांची गर्दी दिसत आहे. अर्थात गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक! त्यामुळे साहजिकच सर्वच मिठाई दुकानांमध्ये मोदकांचा घमघमाट वाढला असून त्याला दिलेल्या आकर्षक रूपामुळे हे हटके मोदक भक्तगणांचे लक्ष वेधून घेत आहेत. गुलाब, बाप्पाचे मखर, विविध रंगांचे देखावे अशा अनेक डिझाईनने सजवलेले हे मोदक आहेत. ठाण्यातील नावाजलेल्या मिठार्इच्या दुकानांमध्ये यासह शेकडो प्रकारच्या मोदकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. याशिवाय ठाणे बाजारपेठेतील मिठाईच्या दुकानात उकडीच्या मोदकांबरोबरच मलई, मावा, रोझ, रसमालाई, मँगो, काजू आणि लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट, फळांच्या चवीचे स्वादिष्ट मोदकही उपलब्ध आहेत.
--------------------------------------
यंदा पाच ते दहा टक्‍के भाव वाढ
ठाण्यातील प्रसिद्ध टिपटॉप मिठाईवाले यांचे डिझाईनर मोदक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे डिझाईनर मोदक विविध चवीच्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असून २.५० ग्रॅम ते १० किलोपर्यंतचे मोदक इथे आहेत. तसेच ज्या भाविकांना मधुमेहसारखे आजार आहेत त्यांच्यासाठी शुगर-फ्री मोदकही बनवण्यात आले आहेत. या मोदकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मोदकांमध्ये फळांच्या चवीचे मोदक म्हणजेच मँगो, किवी, स्ट्रॉबेरी, अंजीर, खजूर या चवीचे मोदक आहेत आणि फळांच्या मोदकांना जास्त प्रमाणात मागणी आहे, असे टिपटॉपचे मालक जयदीप शहा यांनी सांगितले. तसेच दूध, काजू, साखर व इतर सर्व वस्तूंचे भाव वाढल्यामुळे मागच्या वर्षीच्या अनुषंगाने यंदा पाच ते दहा टक्‍के मिठाईचे भाव वाढल्याचे शहा यांनी सांगितले.
-----------------------------------------------
मोदक दर (किलोप्रमाणे)
उकडीचे ३०
फळांच्या चवीचे १८००
दुधाचे ८४०
ड्रायफ्रूट १२८०

आगाऊ ऑर्डरसाठीही रांगा
दोन वर्षांच्या निर्बंधानंतर या वर्षी जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे भाविकांनी आठवडाभर आधीच मोदक व मिठाईची ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे. बाप्पाच्या नैवेद्याला मोठे डिझाईनर मोदक, प्रसादाला देण्यासाठी तसेच भेट म्हणून देण्यासाठी छोट्या मोदकांची मागणी जास्त आहे, असे मिठाईवाल्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94643 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..