शालेय मुलांना मोफत वह्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय मुलांना मोफत वह्यांचे वाटप
शालेय मुलांना मोफत वह्यांचे वाटप

शालेय मुलांना मोफत वह्यांचे वाटप

sakal_logo
By

ठाणे, ता. २७ : धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ, ठाणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय मुलांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

ठाण्यातील जांभळी नाका, मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या या वह्या वाटप कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. धनगर समाजातील पाचवी ते बारावीच्या मुलांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके, डॉ. स्नेहा सोनकाटे, समाजाचे ज्‍येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, अधिकारी राजेश वारे, अनिता हिलाळ, समाजाचे युवा कार्यकर्ते अजय हक्के, दीपक देवकाते, तुषार ढालपे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी धनगर प्रतिष्ठान करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. धनगर प्रतिष्ठान सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवून समाज एकत्र करण्याचे काम करत आहे. कोविडच्या काळातदेखील प्रतिष्ठानने उत्कृष्ट काम केल्‍याचे सांगून समाजाच्या कोणत्याही समस्या असो, आम्ही त्या सोडवू, असे आश्वासन या वेळी आमदार संजय केळकर यांनी दिले.

समाजाच्‍या मागण्‍या सोडवणार
समाजबांधवांना एकत्र आणण्यासाठी धनगर प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. महापालिकेच्या संदर्भातील त्यांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. त्या लवकरात लवकर आम्ही सोडवू, असे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94647 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..