मनसेची खड्डे भ्रमंती जन जागृती मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेची खड्डे भ्रमंती जन जागृती मोहीम
मनसेची खड्डे भ्रमंती जन जागृती मोहीम

मनसेची खड्डे भ्रमंती जन जागृती मोहीम

sakal_logo
By

मनसेची खड्डे भ्रमंती जनजागृती मोहीम
ठेकेदारावर कारवाईची मागणी

भांडुप, ता. २७ (बातमीदार) ः भांडुप परिसरात सुरू असलेली मेट्रोची कामे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र आहे. एस वार्ड विभागात मुख्य रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ कार्यालयीन वेळेत एलबीएस मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत मनसे रस्ते आस्थापना एस विभाग प्रभाग संघटक संतोष पार्टे यांनी सहआयुक्तांना निवेदन दिले असून खड्डे भ्रमंती जनजागृती मोहीम सुरू केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याबाबत मनसेतर्फे सहआयुक्त अजितकुमार अंबी यांना निवेदन देण्यात आले आहे. एलबीएस मार्गावर मेट्रोची कामे झाली आहेत त्या ठिकाणचे बॅरिकेट्स उचलण्यात यावे आणि भांडुप परिसरातील नाहूर रेल्वेस्थानक परिसर, गांधी नगर ते सोनापूर मुख्य रस्ता इत्यादी ठिकाणचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचेही मनसेने म्हटले आहे. एलबीएस मार्गावर काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या मार्गाची रुंदी कमी झाली आहे. रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विक्रोळीच्या गांधीनगर चौकातून भांडुपच्या सोनापूर चौकात जाण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास आंदोलन करू, असा इशारा मनसेने निवेदनात दिला आहे.
गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने प्रशासनाने दखल घ्यावी. तात्पुरत्या स्वरूपात का होईना खड्डे बुजवावेत, अशी मागणी रहिवासी गणेश धनावडे यांनी केली.


प्रत्येक विभागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे खड्डे भ्रमंती करून समस्यांबाबत अधिकारी जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- संतोष पार्टे, प्रभाग संघटक, मनसे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94648 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..