मालवणी ची वाट बिकट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणी ची वाट बिकट..
मालवणी ची वाट बिकट..

मालवणी ची वाट बिकट..

sakal_logo
By

मालवणीची वाट बिकट
मालाड, ता. २७ (बातमीदार) ः महापालिकेचा खड्ड्यांबाबतचा दावा फोल ठरवणारी परिस्थिती सध्या मालाड-मालवणीत पाहायला मिळत आहे. गेट क्रमांक ६ ते ७ पर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने मालवणीची वाट बिकट झाली आहे.
मालवणीतून मालाडला जाण्यासाठी एव्हरशाईन नगरपासून लिंक रोडला जोडणारा महत्त्वाचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. अर्ध्याहून अधिक रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे; परंतु गेट क्रमांक ६ ते ७ पर्यंतचा रस्ता डांबरी असल्याने तिथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. मालवणी ते एव्हरशाईन नगरला जोडणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडल्याने शॉर्टकटचा वापर करणारे पादचारी आणि दुचाकीचालकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांबाबत पालिकेकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत; परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
मालवणीतून ये-जा करण्यासाठी असलेल्या एकमेव पर्यायी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्ता असलेल्या शहीद अब्दुल हमीद रोडवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे, अशी तक्रार दुचाकीचालक शहबाज अन्सारी यांनी केली.
गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील. खड्ड्यांबाबत माहिती घेऊन रस्त्याची दुरुस्ती करू, असे आश्वासन पी उत्तर विभागाच्या सहायक पालिका आयुक्तांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94664 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..