कामगारांना २०२१ च्या निर्णयाप्रमाणे वेतन मिळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारांना २०२१ च्या निर्णयाप्रमाणे वेतन मिळावे
कामगारांना २०२१ च्या निर्णयाप्रमाणे वेतन मिळावे

कामगारांना २०२१ च्या निर्णयाप्रमाणे वेतन मिळावे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे महापालिका कामगारांच्या वेतनात, भत्त्यात बदल न करण्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात/ ग्रेड पे मध्ये कपात करून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा एकतर्फी निर्णय प्रशासनाने घेतल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. याबाबत कामगार नेते व म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनास देण्याची मागणी केली.

सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर ठाणे महापालिकेत किमान ग्रेड पे दोन हजार रुपये आहे. त्याऐवजी तेराशे रुपये ग्रेड पे लावून सातशे रुपयांची कपात करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगार-कर्मचाऱ्यांचे सुमारे तीन ते चार लाख रुपये नुकसान होणार आहे. प्रशासनाच्या या कामगारविरोधी निर्णयाचा कामगार नेते रवी राव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. तसेच ऑक्टोबर २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात कशाही प्रकारे कपात न करता नवीन वेतनश्रेणी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनास देण्याची विनंती केली, अशी माहिती म्युनिसिपल लेबर युनियनचे चिटणीस चेतन आंबोणकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94682 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..