साहित्यांअभावी शवविच्छेदनाला विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यांअभावी शवविच्छेदनाला विलंब
साहित्यांअभावी शवविच्छेदनाला विलंब

साहित्यांअभावी शवविच्छेदनाला विलंब

sakal_logo
By

नागोठणे, ता. २८ (बातमीदार) : नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आवश्यक उपकरणांची कमतरता आहे. यामुळे मृतदेहांची हेळसांड होत आहे. याशिवाय साधनसामुग्रीअभावी शवविच्छेदन होण्यास विलंब होत असल्याने नातेवाईकांनाही ताटकळत राहावे लागत आहे. नातेवाईकांची होणारी गैरसोय आणि मृतदेहांची हेळसांड तत्काळ थांबावी. शव विच्छेदनासाठी लागणारे साहित्य त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतचे निवेदनही मनसे रोहा तालुका माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र तेलंगे यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना दिले आहे.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्याचबरोबर हे आरोग्य केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असल्याने २४ आदिवासी पाड्यांचे रुग्ण प्राथमिक उपचारासाठी येतात. एखादा व्यक्ती मृत झाल्यास त्याला याच रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणावे लागते. मात्र, शवविच्छेदनासाठी आवश्यक असणारे कटर येथे उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. दोन महिन्यांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता. नागोठणे येथील महावितरण कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी धर्मराज भोसले यांचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्या वेळेस आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी कटर उपलब्ध नसल्याने जवळपास तीन तास वाट पाहावी लागली होती. त्यामुळे त्यांचे शव गावाकडेही उशिरा पोहोचले. याप्रकरणी कटर उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात उशीर होतो, अशी कबुली येथील डॉ. अभिजीत शिरसाठ यांनी दिली. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसे पदाधिकारी हरिश्चंद्र तेलंगे यांनी संबंधित माहिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे. प्रशासन याकडे किती संवेदनशीलपणे दखल घेते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
........
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कटर उपलब्ध नसल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. आरोग्य केंद्रात तत्काळ कटर उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
- महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड
.........
कटर नसल्यामुळे शवविच्छेदन करण्यास दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते. परिणामी, नातेवाईकांस मृतदेह देण्यास उशीर होऊन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
- अभिजित शिरसाठ, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागोठणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94688 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..