वसईतील ६९ गावांना पिण्याच्या पाण्याचा सोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईतील ६९ गावांना पिण्याच्या पाण्याचा सोडवा
वसईतील ६९ गावांना पिण्याच्या पाण्याचा सोडवा

वसईतील ६९ गावांना पिण्याच्या पाण्याचा सोडवा

sakal_logo
By

विरार, ता. २७ (बातमीदार) : वसईतील ६९ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना मंजूर होऊनही या भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे बेमुदत उपोषण लवकरच महापालिका मुख्यालयात सुरू करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
वसई तालुक्यातील ६९ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे २००९ रोजी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर ३ जुलै २००९ रोजी वसई-विरार शहर महापालिकेची स्थापना झाली. त्यामुळे या योजनेतील ६९ गावांपैकी ५२ गावांचा समावेश महापालिकेत झाला आहे. ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा’च्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार होती, परंतु महापालिकेच्या माध्यमातून सामायिकपणे योजनेचे काम चालू होते. या योजनेद्वारे ६९ पाण्याचे जलकुंभ उभे करण्यात आले आणि गावागावात पाईपलाईन टाकण्यात आली, पण ही योजना पूर्ण करण्यास विलंब होत आहे. यापूर्वी मार्च २०१९ रोजी योजना पूर्ण करण्याची तारीख अंतिम निश्चित करण्यात आली होती. त्यातच अगोदरची पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असल्याने महापालिकेने नव्याने १२ कोटी खर्च करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले, पण मागील १३ वर्षांपासून ही योजना अद्याप अपूर्ण आहे. याबाबत समीर वर्तक यांनी आयुक्त अनिल पवार यांची भेट घेऊन ‘आम्हाला आमचे हक्काचे पाणी द्या, नाही तर पालिका मुख्यालयात बेमुदम उपोषण करू’ असा इशारा निवेदनाद्वारे दिला. या वेळी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अम्मार पटेल, वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष डेरिक फुरटॅडो, सेवा दल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आलम अन्सारी, सामाजिक कार्यकर्ते दर्शन राऊत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

काय आहे निवेदनात
वसईतील ६९ गावांना त्वरित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे; अन्यथा २२ डिसेंबर २०२० मध्ये महापालिकेने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केलेले ‘बेमुदत उपोषण’ लवकरच मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनातच सुरू करण्यात येईल. जर यामुळे ‘कायदा व सुव्यवस्थेचा’ प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आयुक्तांची राहील, असा इशारा समीर वर्तक यांनी या निवेदनातून दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94693 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..