आधुनिकीकरणात कृषी परंपरेचा बैल पोळा लुप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधुनिकीकरणात कृषी परंपरेचा बैल पोळा लुप्त
आधुनिकीकरणात कृषी परंपरेचा बैल पोळा लुप्त

आधुनिकीकरणात कृषी परंपरेचा बैल पोळा लुप्त

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २७ (बातमीदार) : ग्रामीण भागात कृषी पंरपरेचा बैलपोळा हा सण शेतकरी साजरा करत असत; मात्र आता ट्रॅक्टरचा वापर वाढत असल्यामुळे बैलजोडीची संख्या कमी होत असून ही परंपरा लुप्त होत चालली आहे.
विक्रमगड तालुक्यातील जाणकार शेतकरी व ज्येष्ठ नागरिक बैलपोळ्याबाबत सांगतात, की बैलपोळा या दिवशी ग्रामीण भागांत सकाळीच शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतात. तसेच आपल्या घरासमोर रांगोळी काढून घरात गोडधोड करून साजरा करतात अशी प्रथा आहे. तसेच बैलपोळाला सणात आपल्या बैलजोडीला सजवून त्याची पूजा केली जाते. काळ्या मातीची सेवा करून शेती पिकवायची त्या बैलांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस, पण आता ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे गोठे ओस पडले आहेत. बैलजोड्यांची संख्या घटली, परिणामी पोळा सणही साजरा होत नसल्याचे विदारक चित्र आता दिसू लागले आहे.
सध्या आधुनिक युगामध्ये यांत्रिक युगामुळे शेतीच्या कामातील ट्रॅक्टरच्या वापरामुळे जनावरे कमी होऊ लागली आहेत. पूर्वी होणाऱ्या ग्रामीण भागातील बैलपोळ्याची अगळीवेगळी पंरपरा काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र गाव-खेड्यांत पाहावयास मिळत आहे, अशी खंत जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.
.....
ग्रामीण भागात पोळ्याला पूर्वी अनन्यसाधारण महत्त्व असायचे. या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त करता येत असायची, पण यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. आता ग्रामीण भागात बैलजोडीअभावी अनेक शेतकऱ्यांचे गोठे ओस पडले आहेत. त्यामुळे या सणाचे महत्त्व कमी होत आहे.
- विजय सांबरे, शेतकरी, विक्रमगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94695 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..