बुध्दीजिविंच्या विचारानीच परिवर्तन घडवून विकास शक्य - बिश्वेश्वर टुडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुध्दीजिविंच्या विचारानीच परिवर्तन घडवून विकास शक्य - बिश्वेश्वर टुडू
बुध्दीजिविंच्या विचारानीच परिवर्तन घडवून विकास शक्य - बिश्वेश्वर टुडू

बुध्दीजिविंच्या विचारानीच परिवर्तन घडवून विकास शक्य - बिश्वेश्वर टुडू

sakal_logo
By

बुद्धिजीवींच्या विचारांतून विकास शक्य ः विश्वेश्वर टुडू
डहाणू, ता. २७ (बातमीदार) : केंद्रातील सरकार सबका साथ, सबका विकास, या ध्येयानुसार चालले आहे. यासाठी तळागाळातील लोकांना सोबत घेऊन चालण्यासाठी जोपर्यंत समाजातील वकील, डॉक्टर, पत्रकार अशा बुद्धिजीवींच्या विचारांनी राजकीय परिवर्तनाबरोबरच, सामाजिक परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होणार नाही, असे मत केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू यांनी मांडले.
विश्वेश्वर टुडू हे पालघर लोकसभा मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी तसेच केंद्रीय सरकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात की नाही, हे जाणून घेण्यासाठी तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. ते डहणू येथे आले असता, त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत, भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, बापजी काठोळे, डहाणू विधानसभा प्रभारी हरिश्‍चंद्र भोये, आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस डॉ. हेमंत सावरा यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी टुडू यांचे आदिवासी तारपा नृत्याने जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी डहाणूतील डॉक्टर असोसिएशनमार्फत या भागातील वैद्यकीय सुविधेबद्दल अनेक अडचणी मांडण्यात आल्या; तर महाराष्ट्र चिकू उत्पादक बागायतदार संघाच्या वतीने विनायक बारी यांनी चिकूवर सरकारने तिपटीने विम्याचे दर वाढविल्याचे सांगून चिकू फळासाठी डहाणूत चिकू संशोधन केंद्र उभारण्याची मागणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94696 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..