मंडपाच्या वादातून माथाडी कामगाराचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडपाच्या वादातून माथाडी कामगाराचे अपहरण
मंडपाच्या वादातून माथाडी कामगाराचे अपहरण

मंडपाच्या वादातून माथाडी कामगाराचे अपहरण

sakal_logo
By

मनोर, ता. २७ (बातमीदार) : बोईसर शहरातील व्यावसायिक आणि त्याच्या साथीदारांनी गणेशोत्सवासाठी मंडप तयार करण्याच्या वादातून माथाडी कामगाराचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोईसर शहरातील यशवंत सृष्टी इमारतीच्या आवारात असलेल्या साईबाबा मंदिरालगत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बाळा सोनवणे, रमेश माच्छी, उदय माने, सुबोध संखे, रवी सोनवणे, संतोष चव्हाण आणि अमृत धोडी यांच्या देखरेखीत मंडपउभारणीचे काम सुरू होते.
मंडपउभारणीला असलेल्या विरोधातून शुक्रवारी दुपारी सुधीर विचारे, विक्रांत संखे आणि त्याचे आठ साथीदार मंडपउभारणीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते. या वेळी मंडपाच्या कामाची देखरेख करणारे अमृत धोडी यांचे अपहरण करून त्यांना कारमध्ये कोंबून कार चिल्हार-बोईसर रस्त्यामार्गे महामार्गाच्या दिशेने घेऊन गेले होते; तर बोईसर ते चिल्हार या प्रवासादरम्यान सुधीर विचारे याने धोडी यांना साईबाबा मंदिराजवळचा मंडप काढून टाकण्यास सांगितले, तसेच माझ्या परवानगीशिवाय कोणतेही काम करायचे नाही, असे बजावून ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी अमृत धोडी यांना मारहाण करण्यात आली असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. महामार्गावरील चिल्हार फाटा येथे धोडी यांना सोडून दिल्यानंतर अपहरणकर्त्यांची चारचाकी वाहने मुंबईच्या दिशेने निघून गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. सुधीर विचारे यांच्या पत्नी भावना विचारे या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94699 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..