३२६ कोटीचे तीन रस्ते बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३२६ कोटीचे तीन रस्ते बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी
३२६ कोटीचे तीन रस्ते बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी

३२६ कोटीचे तीन रस्ते बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : ३२६ कोटी तीन रस्त्यांसाठी? हे तिन्ही रस्ते रुणवाल व लोढा बिल्डरच्या फायद्यासाठी बांधले जात आहेत का, असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रशासनाला विचारला आहे. ग्रोथ सेंटरमधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणाऱ्या १० गावांना रस्ते व सुविधा द्या; अन्यथा विरोध होणार. विकासाला विरोध नाही, फक्त प्राथमिकता ठरवा, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

एमएमआरडीएने कल्याण विकास केंद्र प्रकल्पांतर्गत या निविदा मागवल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत उसरघर- निळजे- घेसर या रस्त्याच्या कामासाठी अंदाजित रक्कम १०७.१४ कोटी, निळजे- कोळे- हेदुटने आणि उसरघर- घारीवली या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १२३.४९ कोटी तसेच हेदुटने- माणगाव- भोपर या रस्त्याच्या कामासाठी ९५.९९ कोटी निधी असे एकूण ३२६.६२ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत या निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.
रस्त्यांच्या या सिमेंट काँक्रीटीकरणच्या कामावरून मनसे आमदार पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे आणि एमएमआरडीएला प्रश्‍न विचारला आहे. हे रस्ते रुणवाल व लोढा बिल्डरच्या फायद्यासाठी बांधले आहेत का, असा सवाल पाटील यांनी केला आहे. ग्रोथ सेंटरमधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणाऱ्या १० गावांना रस्ते व सुविधा द्या, अशी मागणी आमदारांनी केली असून, हे केले नाही तर या कामाला विरोध होणार, असा इशारा दिला आहे. विकासाला विरोध नाही, फक्त प्राथमिकता ठरवा, असे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे.

काय आहे ट्विट...

३२६ कोटी, ३ रस्त्यांसाठी? हे तिन्ही रस्ते रुणवाल व लोढा बिल्डरच्या फायद्यासाठी बांधले जात आहेत का? ग्रोथ सेंटरमधील रस्ते करण्याआधी यात बाधित होणाऱ्या १० गावांना रस्ते व सुविधा द्या; अन्यथा विरोध होणार. विकासाला विरोध नाही, फक्त प्राथमिकता ठरवा.
- राजू पाटील, मनसे आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94704 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..