बिल्कीस बानोप्रकरणातील दोषींची सुटका: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिल्कीस बानोप्रकरणातील दोषींची सुटका:
बिल्कीस बानोप्रकरणातील दोषींची सुटका:

बिल्कीस बानोप्रकरणातील दोषींची सुटका:

sakal_logo
By

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे ठाण्यात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २७ : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील दोषींना शिक्षामाफी देण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज कळवा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, वर्षा मोरे, मनाली पाटील, मनीषा साळवी, रचना वैद्य तसेच ठाणे व कळवा विधानसभा क्षेत्र कार्यकारणी सदस्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

सन २००२ मध्ये गुजरात दंगलीत बिल्किस बानो या सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. तसेच तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह कुटुंबातील सर्व सदस्यांना ठार मारण्यात आले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ जणांवर मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या सर्वांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या ११ जणांची मुक्तता करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या या शिक्षामाफीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी महिला कार्यकर्त्यांकडून गुजरात सरकार, मोदी-शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या ११ दोषींना पुन्हा तुरुंगात न डांबल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पाठवण्यात आले.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्री शक्तीचा घातलेला जागर आणि तिच्या सन्मानासाठी व्यक्त केलेल्या कटिबद्धतेचा गजर अजूनही आमच्या कानात घुमत आहे, परंतु यावर विश्वास कसा ठेवायचा, हा प्रश्नही मनात घोळत आहे! कारण १५ ऑगस्ट रोजी सकाळी पंतप्रधानांचे भाषण झाले आणि सायंकाळपर्यंत बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची गुजरात सरकारने सुटका केली. या ११ जणांची सुटका झाल्यानंतर ज्या पद्धतीने काही लोकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला, ज्यांनी त्यांचा सत्कार केला हे लोक कोण आहेत याचाही आपल्या यंत्रणेमार्फत जरा शोध घ्यावा आणि या ११ नराधमांना पुन्हा गजाआड करावे.
- ऋताताई आव्हाड, अध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे-पालघर विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94705 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..