मशीनमध्ये बिघाडामुळे पगारात कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशीनमध्ये बिघाडामुळे पगारात कपात
मशीनमध्ये बिघाडामुळे पगारात कपात

मशीनमध्ये बिघाडामुळे पगारात कपात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. २७ : मुंबई महापालिकेच्या कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी मशीनच्या बिघाडाचा फटका कर्मचाऱ्यांना पगारकपातीच्या रूपात बसत आहे. मशीन सातत्याने बंद पडत असल्याने एेन गणेशोत्सवाच्या तोंडावर कामगारांच्या पगाराची मोठी रक्कम कापून घेण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. आगामी गणेशोत्सवाचा सण लक्षात घेऊनच कामगारांना पूर्ण पगार द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे.
अनेक कामगारांचे सदोष मशीनमुळे २० हजार ते २५ हजार रुपये कापण्यात आले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना शून्य पगार आला आहे; तर कामगारांच्या हातात पगार कापून आल्याने कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. काम करूनही सदोष बायोमेट्रिक मशीनमुळे कामगारांचे खाडे होत असतील, कामगारांचे हजारो रुपये कापले जात असतील, तर अशा हजेरीची सक्ती करण्यात येऊ नये, अशीही मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे. पूर्वीप्रमाणेच मस्टरवर हजेरी लावावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बायोमेट्रिकची हजेरी ही पगाराशी जोडली जाऊ नये. प्रशासनाने यामध्ये चर्चा करून मार्ग काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियननने दिला आहे. गणपती सण लक्षात घेऊन कामगारांना पगार द्यावा, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस वामन काविस्कर यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्याकडे केली आहे. ही विनंती त्यांनी तत्त्वतः मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
...
मशीन तुटपुंज्या
सध्या महानगरपालिकेच्या कार्यालयात घेतल्या गेलेल्या बायोमेट्रिक मशीन या तुटपुंज्या असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. २० कामागारांच्या मागे एक मशीन असे आदेश प्रशासनाने काढले होते; परंतु ७० ते ८० कामगारांसाठी सध्या एक मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे बायोमेट्रिक मशीनवर हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ होते. अनेकदा मशीनला इंटरनेट नसल्याने सर्व्हर कनेक्टिव्हिटीही नसते, असेही युनियनने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94708 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..