मुंबई शहराला ‘एलईडी’ झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई शहराला ‘एलईडी’ झळाळी
मुंबई शहराला ‘एलईडी’ झळाळी

मुंबई शहराला ‘एलईडी’ झळाळी

sakal_logo
By

किरण कारंडे  ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : मुंबईतील पथदिव्यांचे सोडियम वेपर लॅम्प ते एलईडीकरण करण्याचे १०० टक्के लक्ष्य बेस्ट उपक्रम लवकरच गाठणार आहे. मुंबईतील ४२ हजार सोडिअम वेपर लॅम्पचे पिवळ्या रंगाचे दिवे हे आता बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाने एलईडी दिव्यांनी बदलले आहेत. मुंबईत बेस्टच्या वीज वितरण क्षेत्रातील हे दिवे एलईडीत रूपांतरित करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. विजेची बचत होतानाच महापालिकेची पैशांची बचतही झाली आहे. वर्षापोटी मुंबई महानगरपालिकेची १० हजार युनिट्सची बचत या पथदिव्यांच्या एलईडी रूपांतरणामुळे शक्य झाली आहे.
सोडिअम वेपर लॅम्पच्या दिव्यांना साधारणपणे लागणाऱ्या विजेच्या तुलनेत ५० टक्के कमी ऊर्जा ही एलईडी दिव्यांसाठी खर्ची होते. त्यामुळे ४२ हजार दिव्यांच्या एलईडी रूपांतरामुळे ५० टक्के विजेची बचत झाली आहे. सोडियम वेपर लॅम्पच्या दिव्यांसाठी २२० वॉट विजेचा वापर होत होता. आता विजेचा वापर हा ११० वॉट असा कमी झाला आहे. त्यामुळेच महापालिकेची पैशांची मोठी बचत झाली आहे. मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून एलईडी दिवे लावण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या दोन्ही विभागांतील पथदिवे बदलण्यात आले आहेत, अशी माहिती बेस्टचे विद्युत पुरवठा विभागाचे उपमहाव्यवस्थापक नितीन हर्लेकर यांनी दिली.
...
अवघे १०० दिवे बाकी
मुंबईत सध्या ४२ हजार पथदिव्यांपैकी अवघे १०० दिवे हे एलईडीत रूपांतरित करण्याचे काम बाकी राहिले आहे. अनेक ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे तसेच ज्या ठिकाणी बेस्टचे पथदिवे बदलणारे वाहन पोहचत नाही, अशा ठिकाणचे हे १०० दिवे आहेत. हे दिवे एलईडीत रूपांतरित करण्याचे काम हे येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बेस्टच्या वीजपुरवठा क्षेत्रात विजेचे पथदिवे हे १०० टक्के एलईडीत रूपांतरित होतील असे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94719 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..