बिल्कीस बानो प्रकरणाचे डहाणूत उमटले पडसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिल्कीस बानो प्रकरणाचे डहाणूत उमटले पडसाद
बिल्कीस बानो प्रकरणाचे डहाणूत उमटले पडसाद

बिल्कीस बानो प्रकरणाचे डहाणूत उमटले पडसाद

sakal_logo
By

डहाणू, ता. २७ (बातमीदार) : गुजरातमधील गोध्रा हत्याकांड दंगलीच्या वेळी बिल्किस बानो या १९ वर्षीय गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार करत १४ जणांची हत्या करणाऱ्या ११ नराधमांना न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती; मात्र गुजरात सरकारने त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी १५ ऑगस्ट रोजी दोषमुक्त केले. हा स्त्री जातीचा अपमान असून दोषींना पुन्हा शिक्षा देण्याच्या मागणीसाठी डहाणू महिला राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या आघाडीने शनिवारी डहाणू रोड रेल्वे स्थानकासमोर निर्देशने करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष व नगरसेविका कीर्ती मेहता, तालुका अध्यक्ष सुमन राबड, नगरसेविका कविता बारी, जिल्हा सदस्य रेखा माळी, तालुका उपाध्यक्ष पार्वती रावते व इतर महिला उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94730 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..