पंचायत राजमुळे महिलांना आरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचायत राजमुळे महिलांना आरक्षण
पंचायत राजमुळे महिलांना आरक्षण

पंचायत राजमुळे महिलांना आरक्षण

sakal_logo
By

पालघर, ता. २७ (बातमीदार) : पंचायतराज प्रणालीला आता तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रणालीमुळे काही राज्यात महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. महिलांचे सशक्तीकरण होण्यास मदत झाली आहे. १४ लाख महिला आज पंचायतराजमध्ये कार्यरत आहेत; पण त्यांना मार्गदर्शनासाठी आवश्यक अधिकारी, निधी आणि त्याचा वापर करण्यासाठी स्वतंत्र दिले पाहिजे. राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप होत असतो, असे मत माजी पंचायतराज केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पालघर येथे व्यक्त केले.

पालघर मधील माजी आमदार समाजसेवक नवनीत भाई शाह यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानात अय्यर बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्राचार्य किरण सावे, हितेंद्र शहा, कृषी सभापती प्रतिभा गुरोडा, पंचायत समितीचे सभापती रंजना मस्कर, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, नागरिक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

पंचायत राजमध्ये आमदार, खासदार, मंत्री यांना जिल्हास्तरीय नियोजनात सहभागी होण्याची घटनात्मक तरतूद नसताना त्यांना जिल्हा नियोजनात महत्त्वाची भूमिका का दिली जाते किंवा त्यांचा हस्तक्षेप होत असतो, असा प्रश्न अय्यर यांनी उपस्थित केला. मंत्री व आमदार यांनी राज्यपातळीवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी मांडले. वास्तविक मंत्र्यांनी मदत करण्याची अपेक्षा असताना त्याचे उलट चित्र सध्या दिसत आहे. तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्षामार्फत जिल्ह्यातील विकास कामाचे नियोजन होऊन वितरण करण्याचे पूर्ण अधिकार त्यांना द्यावेत, असे त्यांनी मत व्यक्त केले. पंचायत राज्य प्रणालीतील फक्त २० टक्के घटकांची सध्या अंमलबजावणी होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सबलीकरण करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

पंचायतराज प्रणालीमुळे लोकशाही सुदृढ होईल
पेसा कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ओडिसामधील आदिवासी भगिनी देशाच्या राष्ट्रपती विराजमान झाले असून त्या पेसा अंमलबजावणी कायद्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा अय्यर यांनी व्यक्त केली. पंचायत राज प्रणाली अधिक सक्षमपणे राबवली गेल्यास देशातील लोकशाही सुदृढ होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94731 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..