पहिल्याच दिवशी १६३ चाकरमान्यांनी घेतला टोल फ्री पास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्याच दिवशी १६३ चाकरमान्यांनी घेतला टोल फ्री पास
पहिल्याच दिवशी १६३ चाकरमान्यांनी घेतला टोल फ्री पास

पहिल्याच दिवशी १६३ चाकरमान्यांनी घेतला टोल फ्री पास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू होते. त्यात कोकणात गणेशोत्सवासाठी आपल्या खासगी वाहनाने जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट मिळावी, यासाठी परिवहन विभागाकडून टोल पासचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार पास वितरणाच्या पहिल्याच दिवशी १६३ ठाणेकर कोकणवासीयांनी या पासचा लाभ घेतला असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते; परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून शासनाने सण- उत्सवांवर घातलेले निर्बंध उठवले आहेत. त्यातच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांना टोलमधून सुटका मिळावी, यासाठी टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार, २७ ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.


ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना टोलमधून सूट देण्याचा पास दिला जात आहे. हे पास ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून वितरित केले जात आहेत. त्यानुसार पास वितरणाच्या पहिल्याच दिवशी १६३ गणेशभक्तांना टोलमाफीच्या पासचे वितरण करण्यात आले आहे.
- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94745 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..