पान ३ पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ पट्टा
पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

sakal_logo
By

प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नेरूळ (बातमीदार) ः प्रभाग क्रमांक ३५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा निरंत पाटील यांच्या संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरूळ सेक्टर १८ येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी नुकताच गौरव केला. या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक तसेच माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी महापौर जयवंत सुतार यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी गणेश नाईक यांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
------------------------------------------------------
बिलकिस बानोप्रकरणी नवी मुंबईत निदर्शने
बेलापूर (बातमीदार) ः गुजरातमधील बिलकिस बानू प्रकरणातील अकरा गुन्हेगारांना गुजरात सरकारने मुक्त केल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष व महिला कार्यकर्त्यांनी गुजरात आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. शिवाय वाशी येथील शिवाजी चौकातदेखील नवी मुंबईतील विविध संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
हरकतींसाठी मुदतवाढ देण्याची मागणी
तुर्भे (बातमीदार): नवी मुंबई महापालिकेने १० ऑगस्ट रोजी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. भविष्यात शहरातील वाढती लोकसंख्या पाहता सामजिक सुविधांचे भूखंड अपुरे पडणार आहेत. त्यामुळे शहरवासी व अभ्यासकांना या विकास आराखड्यावर विचार विनियम करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. अशातच विकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती सुचनांकरीता मनपाने ६० दिवसांची मुदत दिली आहे. पण, या काळात सणामुळे सार्वजनिक सुट्ट्या येत असल्याने हरकतींसाठी एक महिन्यांची अतिरिक्त मुदत वाढ देण्याची मागणी शहर अभ्यासक विजय घाटे यांनी केली आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
हिरानंदानी पुलाखालील खड्ड्यांपासून मुक्ती
खारघर (बातमीदार) : तीन चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खारघरच्या हिरानंदानी प्रवेशद्वार असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यात गणेशोत्सवासाठी कोकणमधील चाकरमनी गावी जात असल्यामुळे या महामार्गावरील खड्डे बुजविण्यास शासनाने सुरुवात केली आहे. दरम्यान, खारघरच्या प्रवेशद्वारावरहू मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पण हे खड्डे बुजविण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
खारघरमध्ये कॅन्सर केअर युनिट सुरु
खारघर(बातमीदार): येथील डी.पोळ फाउंडेशनच्या आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या होमिओपॅथिक महाविद्यालयात कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर केअर युनिट सुरु करण्यात आले आहे. होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. प्र.प्र. पागे, डॉ.डी.जी बागल यांच्या उपस्थितीत या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमात अंतर्गत गरजू कॅन्सरग्ररस्त रुग्णांच्या राहण्याची व जेवणाची सोय तसेच योगा, मेडिटेशन, पंचकर्म अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या रुग्णांना होमिओपॅथिक औषधौपचाराची गरज असेल, अशा रुग्णांवर मोफत औषधौपचार व समुपदेशन केले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94754 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..