कचरा वर्गीकरणाला तिलांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा वर्गीकरणाला तिलांजली
कचरा वर्गीकरणाला तिलांजली

कचरा वर्गीकरणाला तिलांजली

sakal_logo
By

नेरूळ, ता. २८ (बातमीदार) ः स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यापासून नवी मुंबई महापालिकेकडून विविध अभियान गेल्या सहा वर्षांपासून राबवले जात आहेत. या अभियानाअंतर्गत शहरातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे; परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांवर कचरा वर्गीकरणाची वेळ आली आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहरात झिरो कचराकुंडी हे अभियान राबवले आहे. यासाठी घनकचरा विभागाचे अधिकारी कर्मचारीदेखील फार मेहनत घेत आहेत. यामुळे मागील सहा वर्षांत देशस्तरावर पालिकेचा सन्मान करण्यात आला; परंतु सध्या स्थितीत कचराचे वर्गीकरण हा विषय फार गंभीर झाला आहे. कचराकुंड्या काढून टाकल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर व पदपथांवर कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिथे कचरा कुंड्या नव्हत्या, तिथे पुन्हा कचराकुंडी आणून ठेवले आहेत. तसेत घरातूनच सुका कचरा वर्गीकरण करून द्यावा, असे आवाहनही पालिकेकडून केले जात आहे. मात्र पालिकेच्या आवाहनाला हवातसा प्रतिसाद मिळत नसल्याने कचऱ्याचे वर्गीकरणाची वेळ घनकचरा विभागाचे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आली आहे. अनेक ठिकाणी नागरिक ओला व सुका कचरा एकत्र टाकत असल्यामुळे सफाई कर्मचारी ओला व सुका कचरा वेगवेगळे करत आहे. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याच्या जबाबदारीची विसर नवी मुंबईकरांना पडल्याचे चित्र आहे.
-------------------------------------------
नागरिकांना सांगूनदेखील कचरा वर्गीकरण केले जात नाही. अनेक ठिकाणी ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी डबेदेखील दिले आहेत; परंतु त्याचा वापर केला जात नाही. नागरिकांनी स्वतःहून कचऱ्याचे वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्याने कचरा वर्गीकरण करावे लागत आहे.
- वीरेंद्र पवार, घनकचरा विभाग अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94757 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..