मोबाईल टॉवरविरोधात जनआंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल टॉवरविरोधात जनआंदोलन
मोबाईल टॉवरविरोधात जनआंदोलन

मोबाईल टॉवरविरोधात जनआंदोलन

sakal_logo
By

नेरूळ, ता. २८ (बातमीदार) ः महापालिका प्रशासनाची परवानगी नसतानाही नेरूळमधील साईबाबा हॉटेलवर अनधिकृत मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या टाॅवरला स्थानिक रहिवाशांमधून विरोध होत असून शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता मांडवे यांनी याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे.
नेरूळ, सेक्टर १० येथे रहिवाशांच्या विरोधाला न जुमानता महापालिकेने साईबाबा हॉटेलवर मोबाईल टाॅवरला परवानगी दिली आहे. या टॉवरमुळे साईबाबा हॉटेलनजीक असलेल्या वृंदावन, अरुणोदय, शिवनेरी, इंद्रप्रस्थ, साई कॉर्नर या गृहनिर्माण सोसायटीतील अडीच हजार रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेविका सुनीता मांडवे यांच्या नेतृत्वात मोबाईल टाॅवरविरोधात रविवारी रहिवाशांनी आंदोलन केले. तसेच टाॅवरमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल आजूबाजूच्या रहिवाशांना माहिती दिली गेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या वेळी हा टॉवर हटविल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा स्थानिक नगरसेविका सुनीता मांडवे यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94758 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..