ऐरोलीचे नाट्यगृह प्रगतीपथावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोलीचे नाट्यगृह प्रगतीपथावर
ऐरोलीचे नाट्यगृह प्रगतीपथावर

ऐरोलीचे नाट्यगृह प्रगतीपथावर

sakal_logo
By

वाशी, ता. २८ (बातमीदार) ः ऐरोली, सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर ऐरोली नाट्यगृह बांधण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम प्रगतिपथावर असून फेब्रुवारी २०२४ पर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे मागील आठ वर्षांपासून ऐरोलीतील नाट्यरसिकांची होणारी गैरसोय थांबणार आहे.
नवी मुंबई परिसराचा विकास करताना सिडकोमार्फत सुरुवातीला वाशी, बेलापूर, नेरुळ, तुर्भे हे नोड विकसित करण्यात आले. त्यामुळे नागरी सोयीसुविधा पुरविताना नागरिकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली; पण नवी मुंबईचा दिघ्यापर्यंत झालेला विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता कोपरखैरणेपासून पुढील भागातील नागरिकांसाठी मनोरंजनासाठी हक्काचे ठिकाण असावे, अशा प्रकारची मागणी होत होती. याच अनुषंगाने २४ जुलै २०१३ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मंजुरी देत ऐरोली सेक्टर ५ येथे नवीन नाट्यगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मे. महावीर रोड्स अ‍ॅड इन्फा. प्रा. लि. यांना २० ऑगस्ट २०१४ रोजी या कामाचे कंत्राट देण्यात आले. पण ठेकेदाराच्या आर्थिक विवेचनेमुळे जवळपास सहा वर्षे या नाट्यगृहाचे काम रखडले होते. अखेर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून जुलै २०२१ मध्ये सुपर कंस्ट्रक्शन यांना हे काम दिले आहे. यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च होणार असून दिघा, ऐरोली, घणसोलीमधील नाट्यरसिकांची होणारी फरपट थांबणार आहे.

नाट्यगृहाची संभाव्य रचना
चारमजली नाट्यगृहात विविध सुविधांचा समावेश आहे. त्यात विस्तीर्ण असे कार पार्किंग, तळमजल्यावर तिकीट घर, प्रसाधन गृह, रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार असणार आहे; तर पहिल्या मजल्यावर प्रधानगृह, उपाहारगृह, दुसऱ्या मजल्यावर ग्रीन रूम, प्रशासकीय दालन, बहुउद्देशीय सभागृह, तिसरा मजल्यावर अधिकारी कक्ष, अतिथीगृह, उपाहारगृह आणि चौथ्या मजल्यावर विशेष अतिथीगृह, अधिकारी कक्ष असणार आहे.

आसन व्यवस्था
ऑर्केस्टा - ४७४
दिव्यांगांसाठी - ४
बाल्कनी - ३८२
एकूण - ८६०

चौकट
ऐरोली नाट्यगृहांचे काम हे जलद गतीने सुरू आहे. फेब्रवारी २०२४ पर्यंत काम हे पूर्ण होईल. नाट्यगृहात विविध सुविधांचा समावेश आहे.
- संजय देसाई, शहर अंभियता, नमुंमपा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94762 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..