चेंबूर कॉलोनीतील मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्‍य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेंबूर कॉलोनीतील मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्‍य
चेंबूर कॉलोनीतील मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्‍य

चेंबूर कॉलोनीतील मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्‍य

sakal_logo
By

कुर्ला, ता. २८ (बातमीदार) ः चेंबूर कॉलनीतील इनलॅक्स रुग्णालय मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्‍य निर्माण झाले आहे. पावसामुळे हे खड्डे निर्माण झाल्‍याचे बोलले जात आहे. पाऊस सुरू झाल्‍यावर या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि वाहने अडकून राहतात. या मार्गावरून वाहतूक करणे वाहनचालकांना अत्यंत कठीण जाते, असे नागरिकांनी सांगितले. तसेच या मार्गावर मोठे मार्केट लागलेले असते त्यामुळे मार्गाच्या आजू बाजूने खाद्य पदार्थांच्या, फळ भाज्यांच्या गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे येथे अधिक वाहतूक कोंडी निर्माण होते. या भागात इनलॅक्स रुग्णालय आहे त्यामुळे येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. रुग्णालयाला जाण्यासाठी हा मार्ग आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मार्गाची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे. त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी नागरिकांनी केली आहे.

गोवंडीतही रस्त्याची दुरवस्था
गोवंडी मधील जनशताब्दी इमॅजिन सेंटरच्या बाजूच्या एमबीपीटी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याचीही दुरवस्‍था झाली आहे. येथे रस्त्याच्या मध्यभागी मातीचा थर टाकलेला आहे. हा मार्ग पूर्व मुक्त मार्गाला लागून असल्यामुळे आणि बाजूलाच जनशताब्दी इमॅजिन सेंटर असल्यामुळे येथे सतत नागरिकांची वर्दळ सुरू असते. रस्‍त्‍याच्‍या मध्यभागीच मातीचा थर टाकला असल्‍याने येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच मार्गाच्या आजुबाजूला फळे-भाज्यांच्या गाड्या असल्यामुळे वाहनांसाठी जागा अपुरी पडते आणि अधिक वाहतूक कोंडी निर्माण होते. या संदर्भात नागरिकांनी तक्रार केली आहे. तसेच या मार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94770 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..