मुलुंडमध्ये मंगळागौर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये मंगळागौर
मुलुंडमध्ये मंगळागौर

मुलुंडमध्ये मंगळागौर

sakal_logo
By

मुलुंड, ता. २८ (बातमीदार) : शिवसेना शाखा क्रमांक १०८ आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ मुलुंड यांच्या माध्यमातून मंगळागौर व रणरागिणींच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. माजी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य व शाखा क्रमांक १०८ चे शाखासमन्वय अभिजीत चव्हाण यांनी २६ ऑगस्ट रोजी, राजे संभाजी सांस्कृतिक भवन वीर सावरकर मार्ग मुलुंड पूर्व येथे स्वागताध्यक्षा राजोल संजय पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या ज्योती ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी नगरसेविका दीपमाला बढे, मनीषा तुपे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. डॉ. शुभा इतोलीकर, डॉ. समृद्धी पाटील, राही रेगे, कलाकार कल्याणी परब, नंदिनी सावंत, प्रमिला घाणेकर, राजश्री मोरे, योगशिक्षिका शीतल पालांडे, डॉ. अस्मिता सरमळकर यांचा सन्मान स्वागताध्यक्षा राजोल संजय पाटील व सायली सावंत यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94771 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..