मोहम्मद मुस्तम्मीर खानचा सुवर्ण पंच पालिका शाळाअंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहम्मद मुस्तम्मीर खानचा सुवर्ण पंच
पालिका शाळाअंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत कामगिरी
मोहम्मद मुस्तम्मीर खानचा सुवर्ण पंच पालिका शाळाअंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत कामगिरी

मोहम्मद मुस्तम्मीर खानचा सुवर्ण पंच पालिका शाळाअंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत कामगिरी

sakal_logo
By

चेंबूर, ता. २८ (बातमीदार) ः चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी मनपा शाळा संकुलमध्ये पालिका शाळाअंतर्गत विद्यार्थ्यांची अंतिम बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कलेक्टर कॉलनी संकुलातील चेंबूर कॅम्प इंग्रजी माध्‍यम शाळेतील मोहम्मद मुस्तम्मीर खान याला ३६ किलो वजनी गटात प्रथम (सुवर्ण) पदक मिळाले; तर कलेक्टर कॉलनी हिंदी शाळेतील तौफिक मन्सूरी याने ३८ किलो वजनी गटात तृतीय (ब्रॉन्झ) पदक मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करणारे शारीरिक शिक्षक दीपक आंब्रे व कुंडलिक लाडे यांचाही सत्कार करण्यात आला.
या स्पर्धा बक्षीस वितरणाकरिता उपशिक्षणाधिकारी कीर्तिवर्धन किरतकुडावे, अधीक्षक निसार खान, अधीक्षक सायली सुर्वे, वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, वेटलिफटिंग खेळातील राष्ट्रीय पदक विजेते सहायक पोलिस निरीक्षक मनोज मोरे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94775 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..